अंतर्वस्त्राच्या रंगाचा नियम शाळेने मागे घेतला

30

सामना ऑनलाईन। पुणे

विद्यार्थिनींच्या अंतर्वस्त्राच्या रंगाबद्दल नियम जाहीर करणाऱ्या कोथरुड येथील माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकूल शाळेने हा नियम मागे घेतला आहे. शाळेने विद्यार्थिनींच्या अंतर्वस्त्राचा रंग ठरवण्याचा आचरटपणा केल्याने पाल्य व पालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. याविरोधात शाळा व्यवस्थापनावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही पालकांनी केली होती.

यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने याप्रकरणाची गंभीर दखल घेत या घटनेची चौकशी करण्यासाठी पुण्यातील शिक्षण उपसंचालक समिती शाळेत पाठवण्याचा आदेश जारी केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या