
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कमान बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने या मार्गावरील मुंबईकडे येणारी एक मार्गिका गुरुवारी दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ही वाहतूक बंद राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे येणारी मार्गिका बंद राहणार असल्याने प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. खालापूर टोल- खालापूर गाव- खालापूर फाटा-मार्गे चौक फाटा- दौंड फाटा- शेडूंग टोल, अजिवळी फाटा आणि त्यानंतर परत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ही वाहतूक वळवण्यात आली आहे. म्हणजे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज दोन तासांसाठी वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

























































