नवले ब्रीजजवळ सिग्नलला थांबलेल्या सात वाहनांना ट्रकची धडक

877

ट्रकचालकाच्या दुर्लक्षामुळे सिग्नल थांबलेल्या सात वाहनांना धडक बसली. त्यामुळे वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती सिंहगड पोलिसांनी दिली आहे. ही घटना आज सकाळी नउ वाजण्याच्या सुमारास नवले ब्रीजजवळील सिग्नलला घडली. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी नउच्या सुमारास नवले ब्रीजजवळ असलेला सिग्नल रेड झाला. त्यामुळे चालकांनी वाहने जागीच थांबली. त्यानंतर पाठीमागून आलेल्या ट्रकचालकाने समोरील वाहनाला धडक दिली. त्यामुळे एकापाठोपाठ असलेल्या सात वाहनांना धडक बसली. त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ट्रकचालकाला ब्रेक लागला नसावा विंâवा त्याने दुर्लक्ष केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक विकास मते यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या