
पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. दोन ते तीन वाहने एकमेकांवर धडकल्यानंतर वाहनांना भीषण आग लागली. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
साताऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. अपघातात दोन मोठ्या कंटेनरच्या मध्ये एक चारचाकी चेपली गेली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर नवले पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर तीन ते चार गाड्या एकमेकांवर धडकल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर दोन कंटेनरच्या मध्ये एक कार जळाली. या कारमध्ये एक कुटुंब प्रवास करत होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्नीशमन दलाला यश आले आहे. घटनास्थळी मदकार्य सुरू आहे.




























































