Pune News – सदाशिव पेठेत अग्नीतांडव, रमेश डाईंग इमारतीच्या टेरेसला भीषण आग

पुण्यातील सदाशिव पेठेत रमेश डाईंग इमारतीच्या टेरेसला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. अग्नीशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव इमारत रिकामी करण्यात आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.