अकरावी प्रवेश प्रक्रियेत 3 लाख प्रवेश निश्चित

अकरावी प्रवेश प्रक्रियेत राज्यात आत्तापर्यंत 3 लाख 2 हजार 61 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. यापैकी दोन लाख 31 हजार 456 विद्यार्थ्यांनी ‘कॅप’ अंतर्गत प्रवेश केला असून, 70 हजार 605 विद्यार्थ्यांनी कोटाअंतर्गत प्रवेश घेतले आहेत, अशी माहिती शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.