महिलेला 63 हजारांचा ऑनलाईन गंडा

शॉपिंग साईटचा ग्राहक सेवा प्रतिनिधी असल्याचे सांगत महिलेकडून बँक खात्याची माहिती घेऊन चोरट्याने ऑनलाईन 63 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी याबाबत सनसिटी रस्ता परिसरात राहणाऱ्या 56 वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेला एका व्यक्तीने फोन केला. त्याने रझियाना शॉपिंग साईटचा ग्राहक सेवा प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगितले. त्यांना तुम्ही नवीन खेरदी करा, तुम्ही केलेल्या जुन्या खरेदीचे पैसे परत दिले जातील, असे सांगितले. त्यानंतर त्यांना आरोपीने मी विचारीन ती माहिती द्या. त्यासाठी तुमचा फोन चालू ठेवा, असे सांगून बँक खात्याची सर्व माहिती घेतली आणि त्यांच्या खात्यामधून आरोपीने 63 हजार रुपये ऑनलाईन काढून घेतले. याप्रकरणी तक्रारदाराने तक्रार अर्ज दिला होता. या प्रकरणाबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या