पुण्यात ऑनलाईन वेश्या व्यवसायाचे रॅकेट उद्ध्वस्त, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे शहरातील विविध भागात ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे.

पवित्रकुमार नागेश्वर महतो, दिलीपकुमार उर्पâ करण परमेश्वरव महतो, सचिनकुमार वासुदेव मंडल, अनिलकुमार मेकलाल मंडल (सर्व रा. काळा खडक रोड, वाकड, मूळ- झारखंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरासह परिसरात विव्हा स्ट्रिट वेबसाईटवरुन ऑनलाईन एस्कॉर्टद्वारे वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके आणि कर्मचारी संतोष भांडवलकर यांना मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने संबंधित वेबसाईटनुसार येरवड्यातील रामवाडी परिसरात बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला.

त्यावेळी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी दोन मुलींची सुटका करीत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, पोलीस हवालदार कुमावत, मोहिते, पुकाळे, शिंदे, चव्हाण, संतोष भांडवलकर, खाडे, गायकवाड यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या