बाथरुमच्या बहाण्याने तात्पुरत्या कारागृहातून कैद्याचे पलायन

466

बाथरुमच्या बहाण्याने दरवाजाची कडी तोडून एका कैद्याने तात्पुरत्या कारागृहातून पलायन केले. ही घटना काल रात्री पावणेनउच्या सुमारास तात्पुरते कारागृह येरवड्यात येथे घडली. अनिल विठ्ठल वेताळ असे पळालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विशाल अरुण जाधव (वय 35) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीच्या प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शिरुर न्यायालयाने अनिलला 23 जूनला शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्याला येरवड्यातील तात्पुरत्या कारागृहात दाखल करण्यात आले होते. काल रात्री साडेआठच्या सुमारास अनिलने बाथरुमला जायचे असल्याचे तेथील कर्मचाऱ्याला सांगितले. त्यानुसार कर्मचारी त्याला घेउन बाथरुमपर्यंत गेले. त्यानंतर अनिलने बाथरुमच्या आतील दरवाजाची कडी तोडून गॅलरीतून पलायन केले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक दीनेश गुर्जर अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या