पुणे रिंग रोडचे काम डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होणार

पुणे रिंग रोडच्या  सर्व  168 किलोमीटर लांबीच्या नऊ पॅकेजेसचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. नऊ ते दहा टक्के कामही झाले आहे. डिसेंबर 2027 पर्यंत या रिंग रोडचं काम पूर्ण होईल. अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत दिली. शिरूर ते संभाजीनगर हा सहा पदरी ग्रीन पीडीएफ महामार्गाची डी पी आर बनवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.