कवठे येमाईत घऱफोडी, चोरट्यांची दहशत कायम

522

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात चोरटयांचा सुळसुळाट असून शनिवारी पहाटे पुन्हा एकदा घरफोडीची घटना घडली. इचकेवाडीतील गावडे वस्तीत राहणा-या कासुबाई नानाभाऊ गावडे ही 75 वर्षीय महिला पहाटे लघुशंकेसाठी घराबाहेर आली. त्यावेळी दरवाजाबाहेर दबा धरून बसलेल्या 3 चोरटयांनी महिलेला लाकडी बेडवर ढकलले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील 2 तोळ्याची बोरमाळ व कानातील अर्धा तोळ्याचे 2 कर्णफुले काढून घेतली. तत्पूर्वी घरासमोर लावलेला विजेचा दिवा काढून घराच्या कोपऱ्यावर प्लास्टिक कॅन वरन घराच्या कौलांवर चढून आत शिरण्याचा चोरटयांचा प्रयत्न आतून फळ्या मारलेल्या असल्याने फसला.

चोरटयांनी कासुबाई या त्या घरात एकट्याच असल्याचे पाहून त्यांना चाकू दाखवत गप्प बसण्यास सांगितले. दरम्यान चोरटयांनी घरात ठेवलेली 2700 रुपयांची रक्कम व मोबाईल लांबवला. या घटनेत गावडे यांचा दागिने व रोख रकमेसह सुमारे 70 हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. कासुबाई यांचा मुलगा शिवाजी गावडे हे नोकरी निमित्ताने पुण्यात वास्तव्यास असल्याने घटनेची माहिती समजताच ते आज सकाळीच घरी पोहचले. घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी आजींना सकाळीच तातडीने दवाखान्यात नेऊन उपचार केले.

आपली प्रतिक्रिया द्या