
पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. बोपोडीत किर्लोस्कर कंपनीच्या प्रवेशव्दाराजवळ डंपरच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. वाघोली परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक ठार झाला. महादेव हंबीर कांबळे (वय 59, रा.बोपडी), उत्तम भोजाजी रणखांबे (वय 70, रा. कटकवाडी, वाघोली) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.
काल सायंकाळी कांबळे बोपोडीतील किर्लोस्कर कंपनीच्या गेटजवळून आईला भेटण्यासाठी जात होते. रस्ता ओलांडत असताना भरधाव डंम्परची धडक बसून गंभीर जखमी झाले. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला. नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.
नगर रस्त्यावरील वाघोली गाडे वस्ती अज्ञात वाहनाच्या धडकेत उत्तम भोजाजी रणखांबे यांचा मृत्यू झाला. गुरूवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रस्ता ओलांडत होते. त्यावेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत वाहनाची त्यांचा मृत्य झाला. याप्रकरणी लोणीकंद पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वारजे पुलाजवळ भरधाव दुचाकी घसरून खाली पडल्यानंतर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महेश भीमराव शिंदे (वय 35, रा. रामबाग कॉलनी, कोथरूड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वारजे पोलिस अधिक तपास करत आहेत.































































