पुण्यातील इंजिनीअरिंगचे दोन विद्यार्थी पवना धरणात बुडाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पिंपरी

पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या पुण्यातील इंजिनिअरींग कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा धरणात पोहताना बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. सुजीत जनार्दन घुले (21, रा. नगर) आणि रोहित राजकुमार कोडगिरे (21, रा. नांदेड) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघा विद्यार्थ्यांची नावे आहेत.

सुजीत आणि रोहित हे दोघेही पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये चौथ्या वर्षात शिकत होते. कॉलेजच्या कर्वेनगर येथील वसतिगृहात ते राहत होते. त्यांनी चौथ्या वर्षाची परीक्षा दिली होती. कॉलेजमधील 12 मुला-मुलींचा गट मंगळवारी सकाळी पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आला होता. फागणे गावाच्या बाजूने दुपारी बाराच्या सुमारास सुजीत आणि रोहित यांच्यासह काही जण धरणात पोहायला उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने साडेबाराच्या सुमारास दोघेही बुडाले.