
शहरातील सहकानगर येथील ट्रेझरी पार्क सोसायटीसमोर एका तरुणावर अनोळखी व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी वार केला. या घटनेमध्ये तरुण जखमी झाला असून त्यास उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. सुरज भगत असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार,सहकारनगरमधील ट्रेझरी पार्क येथे एका तरुणावर हल्ला झाल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी भगतच्या हातावर व गुडघ्यावर धारदार शस्त्रांनी वार केल्याच्या अवस्थेत तो पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्यास उपचारांसाठी ससून रूग्णालयामध्ये दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
































































