पुण्यात वादळी वाऱ्यामुळे मोठे होर्डिंग कोसळले, 7 ते 8 दुचाकींचे नुकसान

पुण्याला आज पुन्हा वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यामुळे पुणे अहिल्यानगर महामार्गावरील सणसवाडी येथे रस्त्यालगत असलेले भले मोठे होर्डिंग कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र होर्डिंग खाली पार्क असलेल्या 7 त 8 दुचाकींचे नुकसान झाले.

गेल्या वर्षी मुंबईत मे महिन्यात आलेल्या वादळी पावसाने घाटकोपरमधील छेडानगर येथील होर्डिंग पेट्रोल पंपावर पडले होते. या होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता.