पुणे दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पुणे

पुणे इथे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

पुण्यात इमारतीची भिंत कोसळली, मृतांचा आकडा 15 वर पोहोचला

 

मुख्यमंत्र्यांनी एक ट्विट केले असून त्याद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना हे चौकशीचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांनी लिहलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘पुण्यातील कोंढवा इथे घडलेल्या दुर्घटनेने प्रचंड दु:ख झाले आहे. या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करत असून दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी मी प्रार्थना करीत आहे’

मला वाटलं माझ्यावर इमारत कोसळली! सुदैवी मजुराने सांगितली काळरात्रीची कहाणी