
मांडूळ विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 22 रुपयांचे तीन किलो मांडूळ जप्त करण्यात आले. महेश भिमाजी थोरात आणि चंद्रकांत काशिनाथ देशमुख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील प्रेस कॉलनीजवळ दोघे जण मांडूळ विक्रीसाठी आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसानी सापळा रचून महेश आणि चंद्रकांतला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 22 लाख रुपये किमतीचे तीन किलो मांडूळ जप्त करून कात्रज सर्पउद्यानात जमा करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या पथकाने केली.


























































