
विनामास्क कारवाई केल्याचा राग आल्यामुळे तरूणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री साडेअकाराच्या सुमारास जेधे चौकात घडली. गणेश अंकुश मोरे (वय 38, रा. धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सलमान इस्माईल मुल्ला यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी रात्री सव्वा अकराच्या सुमारास स्वारगेट पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी चौकात थांबून विनामास्क नागरिकांविरूद्ध दंडात्मक कारवाई करीत होते. त्यावेळी तेथे असलेल्या गणेश विनामास्क असल्याचे पोलिसांना दिसून आल्यामुळे त्याच्याविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याचा राग आल्यामुळे गणेशने कर्मचारी अधिकाNयांना शिवीगाळ करून स्वतःच्या दुचाकीतील पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक शबनम शेख यांनी दिली आहे.


























































