
पुणे शहरातील मध्यवर्ती डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन आणि पादचारी उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यात येणार असल्याने वाहतुकीत बदल केला आहे. त्यानुसार डेक्कन पीएमटी बसस्थानक परिसरातून भिडे पुलाकडे जाणारी वाहतूक 13 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर कालावधीत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.
पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे
– डेक्कन पीएमटी बसस्थानक परिसरातून भिडे पुलाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहनचालकांनी डेक्कन पीएमटी बसस्टॉप गरवारे पुलावरून खंडोजीबाबा चौक, अलका टॉकीज चौक केळकर रोडने इच्छितस्थळी जावे.
– जंगली महाराज रोडवरून भिडे पुलाकडे जाणाऱ्या चालकांनी काकासाहेब गाडगीळ पुलावरून (झेड ब्रिज मार्गे) इच्छितस्थळी मार्गस्थ व्हावे.
– भिडे पुल उजवीकडे वळुन हॉटेल सुकांता समोरून वाहनचालकांनी जंगली महाराज रस्त्याचा वापर करावा.


























































