
कोरोनाचे संकट पाहता ओडिशातील भगवान जगन्नाथाची यात्रा रद्द करण्यात आली होती. यात्रेला परवानगी मिळावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात विहिंपसह अनेकांनी पुर्नविचार याचिका दाखल करण्यात आली होती. गर्दी टाळून ही यात्रा होऊ शकते असे याचिका कर्त्यांनी न्यायालयात म्हटले.
जगन्नाथ यात्रेची मोठी परंपरा आहे. ही यात्रा अशा प्रकारे थांबवता येणार नाही असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हटले. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक दिवसाचा कर्फ्यू लावता येईल असे केंद्र सरकारने म्हटले. ज्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असेल त्यांना या यात्रेत सामील करता येईल. तसेच यात्रेचे थेट प्रसारण टीव्हीवर करता येईल. त्यामुळे भाविकांना दर्शनाचा लाभ होईल असेही केंद्र सरकारने म्हटले आहे.


























































