झेलेन्स्की मॉस्कोत आले तर चर्चा करेन! – व्लादिमीर पुतीन

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की हे चर्चेसाठी उतावीळ झाल्याचे पाहून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दबावतंत्र सुरू केले आहे. ‘झेलेन्स्की पूर्ण तयारीने चर्चेला येत असतील, तर माझीही तयारी आहे. मात्र त्यासाठी त्यांना मॉस्कोमध्ये येऊ द्या,’ अशी भूमिका रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी घेतली आहे.