
सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
चंद्रपूरात एका अजगराने तब्बल सात कोंबड्यांचा फडशा पाडून संडे साजरा केला आहे. शहरातील अष्टभुजा परिसरात 10 फुटी महाकाय अजगराने घराबाहेरील ठेवलेल्या बांबूच्या टोपलीत शिरला आणि त्यातील सात कोंबड्या फस्त केल्या. कोंबड्यांवर ताव मारून अजगर सुस्त पडलेला असल्याचे लक्षात आल्यावर नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र प्रसंगावधान दाखवून सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. सर्पमित्रांनी अजगराला पकडल्यावर गिळलेल्या सर्व कोंबड्या बाहेर काढल्या. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्पमित्रांनी या अजगराला जंगलात सुखरूप सोडले.





























































