
चांगले पोषण हे मुलांच्या वाढी, विकास आणि एकूणच आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे — तरीही हिंदुस्थानातील अनेक मुलांना अजूनही कुपोषणाचा सामना करावा लागतो. जागतिक पोषण दिनानिमित्त, आम्ही पेप्सिको इंडियाशी त्यांच्या पोषणावर लक्ष केंद्रित केलेल्या ‘क्वेकर बाऊल ऑफ ग्रोथ’ या उपक्रमाच्या वाढत्या प्रभावाबद्दल संवाद साधला. या उपक्रमाद्वारे मुंबई आणि पुणे येथे 4.2 लाखांहून अधिक पौष्टिक जेवण पुरवण्यात आली असून 3 ते 14 वर्षे वयोगटातील 14 हजारहून अधिक मुलांपर्यंत (मुंबईत चार हजार आणि पुण्यात दहा हजार) पोहोच करण्यात आली आहे. पेप्सिको इंडियाच्या ‘पार्टनरशिप ऑफ प्रोग्रेस’ या तत्त्वावर आधारित, आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने राबवला जाणारा हा उपक्रम समुदाय-आधारित शाश्वत उपायांद्वारे कुपोषणावर मात करत आहे.
मुंबईमध्येच तीन लाखाहून अधिक पौष्टिक जेवण 32 प्राथमिक शाळा आणि 56 बालवाड्यांमध्ये पुरवण्यात आली आहेत, जसे की भायखळा, दादर, परळ, सायन, चिंचपोकळी, कॉटन ग्रीन, जीटीबी नगर आणि वडाळा. या उपक्रमाद्वारे स्थानिक स्वाद असलेली पोषणमूल्ये असलेली जेवने/पंजीरी दररोज दिली जातात. यासोबत कुटुंबे व समुदायांमध्ये दीर्घकालीन वर्तनबदल घडवण्यासाठी कार्यशाळा आणि शैक्षणिक साधने देखील दिली जातात. पेप्सिको फाउंडेशन (पेप्सिकोची सामाजिक उपक्रमांची शाखा), पेप्सिको R&D टीम आणि ब्रँड क्वेकर, तसेच ममता-HIMC आणि अक्षय चैतन्य या स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम तीन प्रमुख स्तंभांवर आधारित आहे: पोषण, जागरूकता आणि शिक्षण.
या उपक्रमात पालकांना कुपोषण ओळखणे, त्याची लक्षणे समजून घेणे आणि जोखीम घटक ओळखणे या बाबतीत शिक्षित केले जाते. यामध्ये विशेषतः लोहअभावामुळे होणाऱ्या अशक्तपणावर भर दिला जातो — त्याची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय. मुंबई आणि पुणे येथे 400 हून अधिक सत्रे घेण्यात आली असून फ्लिपबुक्स, पोस्टर्स, सहभागी कृती आणि ‘पोषण कविता’ सारख्या सर्जनशील माध्यमांचा वापर करून शिक्षण दिले गेले आहे. यावर्षी, या उपक्रमात एक व्हॉट्सअॅप आधारित सहभाग प्रणाली सुरू करण्यात आली असून, विशेषतः काम करणाऱ्या पालकांसाठी हिंदी आणि मराठीत मल्टिलिंगुअल मेसेजेसच्या माध्यमातून मूलांचे आरोग्य आणि पोषण याबाबत सातत्याने माहिती दिली जाते.