
सामना ऑनलाईन । मुंबई
आपल्याला पावलोपावली पडणाऱ्या प्रश्नांना ‘Quora’ या व्यासपीठावरून उत्तरं मिळतात. पण अनेकदा भाषेच्या अडचणीमुळे अनेकांचे प्रश्न तसेच राहून जातात. आता तुम्ही मराठीत प्रश्न विचारून त्याची मराठीत उत्तरं मिळवू शकतात. कारण ‘Quora’ आता मराठीत उपलब्ध झाले आहे.
‘जागतिक ज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि व्याप्ती वाढविणे’. सर्व ज्ञान हे वेगवेगळ्या भाषेत उपलब्ध करून देणे, हा Quora चा प्रामाणिक प्रयत्न आहे. हे व्यासपीठ दरमहा जगभरातील 30 कोटी लोकांमार्फत वापरले जाते. गेल्या आठवड्यात मराठीसोबतच 7 नवीन भाषांमध्ये हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामध्ये बंगाली, तमिळ, डॅनिश, नॉर्वेजियन, डच, फिनिश आणि स्वीडिश या भाषांचा समावेश आहे. तसेच हिंदी या भारतीय भाषेतही हे व्यासपीठ उपलब्ध आहे.
मराठी व्यासपीठाची लिंक: https://mr.quora.com
अधिक माहितीसाठी Quora चा हा मराठी व्हिडीओ पाहा:






























































