
सामना ऑनलाई । पाटणा
बिहारच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष हे चारा घोटाळय़ाप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. दुसरीकडे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना या धामधुमीत माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी लालूंवर एक कविता लिहून त्यांनी त्यांची आठवण जागवली आहे. जीवन में लालू है, कण-कण में लालू है असे प्रेम त्यांनी लालूंवर आपल्या कवितेमधून व्यक्त केले आहे.
कोई कैसे करेगा जुदा,
कोई कैसे करेगा जुदा
जीवन में लालू है
जन जन में लालू है
कण कण में लालू है
हर मन में लालू है
असे लालू यांच्या कवितेमधील काही ओळी आहेत. पतीच्या गैरहजेरीत राबडीदेवी यांनी राजदचा प्रचार जोरात चालविला आहे. मात्र मोठा पुत्र तेजप्रताप याच्या बंडाळीने त्या व्यथीत झालेल्या आहेत. लालू तुरुंगात आहेत. शेवटी आपल्या निराशेला वाट करून देण्यासाठी त्यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिलेली कविता त्यांनी शेअर केली आहे. लालू तुरुंगात असले तरी अद्यापि ते लोकप्रिय आहेत. यामुळे त्यांनी जन जन में लालू है असे या कवितेत नमूद केले आहे.
























































