मोदींची जनधन लूट; राहुल गांधी यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महागाई दर आणि एफडीवरील व्याजाचे घटते दर या मुद्दय़ांवरून कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान मोदींच्या ‘मास्टरस्ट्रोक’मुळे तुमचा कष्टाचा पैसा नष्ट झाला. ही तर मोदींची जनधन लूट योजना आहे, अशा शब्दांत भाजप सरकारवर राहुल गांधींनी जोरदार निशाणा साधला आहे.

राहुल गांधी म्हणाले, महागाईचा दर 6.95 टक्क्यांवर आला आहे, तर एफडीचा व्याजदर 5 टक्क्यांवर आला आहे. तुमच्या बँक खात्यात 15 लाख जमा करणे विसरून जा.