काँग्रेस नेते राहुल गांधी कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता ते चर्चेत आले आहेत ते एका मोच्याला केलेल्या मदतीमुळे. राहुल गांधी यांनी सोमवारी सुल्तानपुरचा मोची रामचेतला चपला बनविण्याचे साहित्य पाठवले आहे. आज सामान घेऊन त्याच्या दुकानावर पोहोचलेल्या लोकांनी ते सामान राहुल गांधी यांनी पाठविल्याचे सांगितले. त्या सामानामुळे त्याचा व्यवसाय उभारण्यासाठी त्याला मोठा हातभार मिळालेला आहे.
रामचेत या मोच्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी राहुल गांधी यांनी कच्च्या मालासोबत लहान-लहान मशिनही पाठवल्या आहेत. यामध्ये चामडे, लेदरपेस्ट, धागा, सुई आदी शिवणकामाचे साहित्य आहे. आजबाजूच्या लोकांना याबाबत माहिती मिळताच रामचेतच्या दुकानावर गर्दी झाली होती.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी एका प्रकरणाच्या संदर्भात सुलतानपूरमध्ये आले होते, तेव्हा त्यांनी रामचेतच्या दुकानात जाऊन बूट शिवले होते, तेव्हापासून रामचेत चर्चेत आला होता. राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात अनेकदा रामचेत याचा उल्लेख केला आहे. बैठकीनंतर राहुलने रामचेतला शू शिलाई मशीनही पाठवले होते. त्याचवेळी रामचेतने शूज बनवून राहुल गांधींना पाठवले होते, ज्याचा व्हिडीओ राहुल गांधींनी सोशल मीडियावर अपलोड केला होता. यावेळी त्यांनी रामचेत यांच्या कामाचे कौतुकही केले. आता सोमवारी राहुल गांधींनी पुन्हा रामचेतला माल पाठवला आहे.
राहुल गांधींनी शिवलेल्या बुटाची किंमत लाखांत होती पण रामचेतने ते विकण्यास नकार दिला. ते विकणार नसल्याचे सांगितले. राहुल गांधींनी हे साहित्य रामचेतला पाठवले आहे ज्यात चपला, चामड्याचे पत्रे आणि शिवणकामाचे साहित्य आहे. नुकतेच एका कार्यक्रमानिमित्त प्रयागराजमध्ये आलेल्या राहुल गांधींनी रामचेतचे कौतुक केले होते आणि सांगितले होते की त्यांच्याकडे एक कौशल्य आहे जे फार कमी लोकांकडे आहे. त्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले होते