
निवडणूक आयोगाला बिहारमध्ये मतदार याद्यांची फेरतपासणी करण्याच्या नावाखाली मतांची चोरी करताना रंगेहाथ पकडल्याचा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला असून पुराव्यादाखल एक व्हिडीओही एक्सवरून शेअर केला आहे. तसेच निवडणूक आयोग आता पूर्णपणे भाजपची निवडणूक चोरी शाखा बनले आहे का? असा बोचरा सवालही त्यांनी एक्सवरील पोस्टद्वारे मोदी सरकारला केला.
बिहार में चुनाव आयोग ‘SIR’ के नाम पर रंगे हाथ वोट चोरी करता पकड़ा गया।
काम सिर्फ़ चोरी, नाम ‘SIR’ – पर्दाफाश करने वाले पर होगी FIR!
EC अब भी ‘Election Commission’ है या पूरी तरह BJP की ‘Election Chori’ शाखा बन चुका है?#VoteChori https://t.co/sigNsspa4a
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 17, 2025
निवडणूक आयोगाचे काम केवळ चोरी आणि नाव विशेष फेरतपासणी… यांचा पर्दाफाश करणाऱयांवर आता एफआयआर दाखल होणार. राहुल गांधी यांनी अजित अन्जुम यांच्या यूटय़ूब चॅनेलचा व्हिडीओ एक्सवरून शेअर केला आहे.
यूटय़ूब चॅनेलवरून निवडणूक आयोगाचा मतदार याद्यांच्या फेरतपासणीच्या नावाखाली सुरू असलेल्या सावळ्यागोंधळाची मालिकाच प्रसारित करण्यात आली आहे.
यूटय़ूब चॅनेल मालकाविरोधात जातीय तणाव पसरवल्याचा गुन्हा
यूटय़ूब चॅनेलचे मालक अजित अंजुम यांच्यावर बेगुसराय जिह्यात जातीय तणाव पसरवल्याचा गुन्हा स्थानिक प्रशासनाने दाखल केला. अंजुन यांनी आरोप फेटाळले असून एफआयरचा स्क्रीन शॉट एक्सवरून शेअर केला आहे.
निवडणूक कर्मचारीच कोरे मतदार अर्ज भरून सह्या करत होते
व्हिडीओत निवडणूक आयोगाचे कर्मचारी कुणाच्याही घरी न जाता स्वतःच मतदारांचा अर्ज भरून मागे सह्या करताना दिसत आहेत. समोर कोऱया अर्जांचा बंडल पडला आहे. जिल्हा प्रशासन आणि निवडणूक अधिकाऱयांच्या आदेशाने ते काम करत असल्याचे या कर्मचाऱयांनी सांगितले. मात्र, त्यांच्यावर दबाव असल्याचे यूटय़ूब चॅनेलच्या पत्रकाराने सांगितले. करा सह्या, तुमची मजबुरी आहे आणखी काय असे तो म्हणाला. त्यानंतर त्याने आणखी प्रश्न विचारताच निवडणूक कर्मचाऱयांनी तुम्ही कोण? असा उलट प्रश्न करून व्हिडीओ बंद करण्यास सांगितले.