
दुबार मतदार आणि मतदान याद्यांमधील घोळ यावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोपप्रत्यार सुरू आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला धारेवर धरले आहे. बनावट आधार कार्ड कसे बनवले जातात याचा डेमो देताना डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड बनवून दाखवले म्हणून माझ्यावर भाजपने गुन्हा दाखल केला होता. मात्र, आता राहुल गांधींचा डेमो बघून भाजपचे डोळे उघडतील, असा टोला लगावला आहे.
बनावट आधार कार्ड कसे बनवले जातात याचा डेमो देताना डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड बनवून दाखवले म्हणून माझ्यावर भाजपने गुन्हा दाखल केला होता. आज राहुल गांधीनी ब्राझिलियन मॉडेल Matheus Ferrero च्या नावाने दहा वेगवेगळ्या बुथवर २२ वेळेस हरियाणामध्ये मतदार नोंदणी झाल्याचे पुराव्यासकट… pic.twitter.com/et1qCFjDRm
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 5, 2025
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आपली सडेतोड मतं आपल्या सोशल मीडियाच्या एक्स अकाऊंटवरून मांडत असतात. बनावट आधार कार्ड कसे बनवले जातात याचा डेमो देताना डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड बनवून दाखवले म्हणून माझ्यावर भाजपने गुन्हा दाखल केला होता. आज राहुल गांधीनी ब्राझिलियन मॉडेल Matheus Ferrero च्या नावाने दहा वेगवेगळ्या बुथवर 22 वेळेस हरयाणामध्ये मतदार नोंदणी झाल्याचे पुराव्यासकट सिद्ध केले. राहुल गांधींचा डेमो बघून माझ्यावर बनावट गुन्हा दाखल करणाऱ्या भाजपचे डोळे उघडतील, ही अपेक्षा! असेही रोहित पवार म्हणाले.



























































