डेटा निवडणूक आयोगाचा तर सही मी का करू? हे मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी सुरू; EC च्या नोटीसीला राहुल गांधींचे प्रत्युत्तर

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाने त्यांना पाठवलेल्या नोटीसीवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले की, “हा निवडणूक आयोगाचा (ECI) डेटा आहे. हा माझा डेटा नाही ज्यावर मी स्वाक्षरी करेन. तो डेटा तुमच्या वेबसाइटवर टाका (निवडणूक आयोगाच्या) आणि तुम्हाला कळेल. हे सर्व फक्त या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी आहे. हे केवळ बेंगळुरूमध्येच नाही तर इतर अनेक मतदारसंघांमध्येही घडले आहे.”

नवी दिल्लीत मतचोरी विरोधात इंडिया आघाडीने संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत प्रचंड मोर्चा काढला. मात्र त्यांना मधेच अडवण्यात आलं. यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, 300 खासदारांनी निवडणूक आयोगाला भेटून एक दस्तऐवज सादर करण्याचा प्रयत्न केला. परंतु आयोगाने त्यांना भेटण्यास नकार दिला. ते घाबरलेले आहेत. 300 खासदार आले आणि त्यांचं सत्य उघड झालं तर, काय होईल?”

ते पुढे म्हटले की, “ही लढाई आता राजकीय राहिलेली नाही, तर ती संविधान आणि ‘एक व्यक्ती, एक मत’ या तत्त्वासाठी आहे. ही देशाच्या आत्म्यासाठीची लढाई आहे.”