
बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारात आपला जोर वाढवला आहे. यातच आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी बिहारमधील बेगुसराय येथे पोहोचले. यावेळी येथे एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं. बेगुसराय येथे पोहोचलेले राहुल गांधी यांनी स्थानिक मच्छिमारांसोबत तलावात उडी मारली आणि पारंपारिक पद्धतीने मासेमारी केली.
दरम्यान, राहुल गांधी यांचा तलावात उतरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
राहुल गांधींनी तलावात मारली उडी, मच्छिमारांसोबत पारंपारिक पद्धतीने केली मासेमारी pic.twitter.com/BaMST9C1Tm
— Saamana Online (@SaamanaOnline) November 2, 2025
























































