
जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी जालन्यातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये सुरू असणाऱ्या कुंटनखान्यावर छापा टाकुन 3 पुरुष आरोपीसह एक कुंटणखाना चालविणार्या महिलेला अटक केली आहे. तसेच तीन पिडीत महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री जालन्यातील अंबड चौफुलीजवळील यशवंतनगर पाटीजवळ करण्यात आली आहे.
जालना ते अंबड मार्गाजवळ असलेल्या यशवंतनगर पाटीजवळील उच्चभ्रू सोसायटीमध्ये घरात एक महिला कुंटणखाना चालवत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी यशवंतनगर पाटीजवळील या सोसायटीमध्ये भाड्याने घेतलेल्या एका घरात महिला आशा मनोहर पवार (रा. सतकरनगर, जालना) बाहेरुन महिलांना आणून वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. तेथे कुंटणखाना चालविणारी आशा मनोहर पवार आणि तीन पुरुष आरोपींसह तीन पिडीत महिला आढळल्या. त्या पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच आरोपींकडूनएकुण 74 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कुंटनखाना चालविणारी महिलेसह इतर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आशा मनोहर पवार, सचिन सुभाष जाधव, बाबुलाल खिमाराम चौधरी आणि सचिन अंकुश खोमणे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुध्द सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या तक्रारीनुसार जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक सिध्दार्थ बारवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, रामप्रसाद पव्हरे, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, फुलचंद गव्हाणे, कैलास खाडे, सुधीर वाघमारे, इर्शाद पटेल, सतिष श्रीवास, सोपान क्षिरसागर, रमेश काळे, कविता काकस, सत्यभामा काकडे सर्व स्थागुशा जालना यांनी केली आहे.




























































