
सामाजिक सुरक्षा विभागाने उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डयावर छापा टाकून 22 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 2 लाख 26 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. बाळू सीताराम मराठे, सचिन बाळासाहेब गायकवाड, कुमार शेट्टी रायडू, लक्ष्मण पांडुरंग कासार, नरेंद्र भवरलाल राव, नितीन दिनकर मोरे, गणेश नथू दहिभाते, किरण प्रकाश चौधरी, वनाजी चंद्रकांत सटवते, निसार सांडू सय्यद, चंद्रकांत विठ्ठल कांबळे, संतोष बबनराव माने, ओंकार शशिकांत क्षीरसागर, सचिन राजेंद्र कळमकर, स्वप्नील दत्तात्रय गायकवाड, जितेंद्र दत्तोबा जाधव, राज जयंता करकेरा, मंगेश सुरेश काळे, कृष्णा गोविंद लाकडे, सुजित मेघनाथ मंडल, अभिषेक जयसिंग गायकवाडअशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. जागा मालक बाळासाहेब दांगट यांच्याविरूद्ध उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तमनगरमधील एनडीए रस्त्यावर असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंगमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास छापा टाकून 22 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाइल, जुगार खेळण्याचे साहित्य रोकड असा 2 लाख 26 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. ही कामगिरी अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या पथकाने केली.




























































