जालन्यातील कैकाडी मोहल्ल्यात गावठी हातभट्टीवर छापा; 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुना जालना विभागातील कैकाडी मोहल्ल्यात विशेष पथकाने छापा टाकून हातभट्टी दारु व रसायन असा 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जालना पोलिसांच्या विशेष पथकाला माहिती मिळाली की, कैकाडी मोहल्ला येथे गावठी हातभट्टी दारु तयार करुन चोरटी विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन विशेष पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी कैकाडी मोहल्ल्यात छापा टाकला. त्यावेळी एक महिला व आरोपी विजय कुंडलिकराव राऊत,ताराचंद हरीचंद्र पवार ( रा. कैकाडी मोहल्ला, जुना जालना) हे दिसले. त्यांच्या घराची पाहणी केली असता घराच्या वाड्यामध्ये 11 सुरू असलेल्या हातभट्ट्या, तयार झालेली गावठी हातभट्टी दारु व ड्रममध्ये गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन असा एकूण 2 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधिक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारु विरोधी पथकातील उपनिरीक्षक संपत पवार, पोना सुरेश राठोड, रामेश्वर बघाटे, राम पव्हरे, राजेंद्र वेलदोडे, यशवंत मुंढे, किशोर जाधव, परमेश्वर धुमाळ, अल्का केंद्रे, रत्नमाला येडके व चालक धोडींराम मोरे यांनी केली आहे.