पश्चिम बंगालमधील आद्रा आणि खरगपूर विभागातील दोन स्थानकांवर कुर्मी समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी सुरू केलेले रेल रोको आंदोलन तब्बल पाच दिवसांनंतर रविवारी सकाळी मागे घेण्यात आले. आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावरील नाकेबंदीही उठवली, असे ते म्हणाले.
20 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे 250हून अधिक एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाडय़ा रद्द करण्यात आल्या आणि राष्ट्रीय महामार्ग सहावर शेकडो मालवाहनांच्या रांगा लागल्या. रविवारी सकाळी 7 वाजता नाकेबंदी उठविल्यानंतर दक्षिण पूर्व रेल्वेच्या अखत्यारीतील खरगपूर आणि आद्रा विभागातील रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आल्या, असे एसईआरच्या अधिकाऱयाने सांगितले. अनेक किलोमीटर वाहतूककाsंडीमुळे अडकून पडलेल्या शेकडो ट्रक आणि बसेस आंदोलन मागे घेतल्यानंतर पुढे जाऊ लागल्या. अनुसूचित जमाती दर्जा आणि घटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये कुरमाळी भाषेचा समावेश करण्यासाठी कुर्मींनी 20 सप्टेंबर रोजी पश्चिम बंगाल आणि शेजारील राज्यांमध्ये प्रथम रेल्वे आणि रास्ता रोको सुरू केले होते. झारखंड आणि ओडिशात मात्र त्यादिवशीच रेल्वे रुळांची नाकेबंदी उठविण्यात आली होती, पण पश्चिम बंगालचे आंदोलन सुरूच होते.
























































