रेल्वे अधिकाऱ्यांच्या आलिशान ‘सलून’चे टुरिस्ट ट्रेनमध्ये रूपांतर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेने ‘तेजस’ एक्प्रेसद्वारे पहिल्या खासगी ट्रेनचा प्रयोग केल्यानंतर आता उत्पन्नाचे विविध मार्ग आजमावून पाहण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या ताफ्यातील ब्रिटिशकालीन आलिशान राजेशाही ‘सलून’ना आता रेल्वेने लक्झरी टुरिस्ट ट्रेनमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा 200 सलून 10 लक्झरी टुरिस्ट ट्रेनमध्ये परिवर्तन करण्यात येणार आहेत.

रेल्वेला अतिरिक्त कमाई मिळण्यासाठी आयआरसीटीसीमार्फत या ट्रेन विविध पर्यटन स्थळांवर धावणार आहेत. रेल्वेकडे ब्रिटिशकाळापासून राजेशाही थाट असलेले कोच असून त्यांना ‘सलून’ म्हणून संबोधले जाते. विविध संस्थानांचे राजेदेखील आपल्या सवारीसाठी असे ‘सलून’ वापरायचे. या ‘सलून’मध्ये दोन बेडरूम, लाऊंज, पॅण्ट्री, प्रसाधनगृह आणि किचन असा सर्व जामानिमा असतो. रेल्वेचे महाव्यवस्थापक किंवा बडे अधिकारी असे ‘सलून’ एखाद्या भागात पाहणी करण्यासाठी जाताना वापरतात.