शुभवार्ता! रेल्वेत 11 हजार लोको पायलटची भरती!! शॉर्ट नोटिफिकेशन जारी, शॉर्ट नोटिफिकेशन जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तयारी करणाऱया तरुणांना रेल्वेने एक गोड बातमी दिली आहे. रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी) ने असिस्टंट लोको पायलटच्या एकूण 11 हजार 127 पदांच्या भरतीसाठी शॉर्ट नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार पदासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील. रेल्वेची ही भरती देशभरातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

या भरतीसाठी पात्र उमेदवार 15 मे 2026 पासून अर्ज भरू शकतील. अर्ज भरण्याची अखेरची तारीख 14 जून 2026 पर्यंत असणार आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइट www.rrbapply.gov.in वर देण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षांपर्यंत असायला हवे. सरकारी नियमानुसार, एससी, एसटी, ओबीसीसह अन्य आरक्षित वर्गातील उमेदवाराला वयात सूट दिली जाईल. असिस्टंट लोको पायलट भरतीसाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असायला हवा, तसेच त्याने फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, टर्नर, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मॅकेनिक मोटर वाहन, रेफ्रिजरेशन किंवा एसी मॅकेनिक, मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाइल इंजिनीअरिंगमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा केलेला असायला हवा.

कशी होणार निवड

रेल्वेतील असिस्टंट लोको पायलट उमेदवाराची निवड प्रक्रिया काही टप्प्यात केली जाईल. सर्वात आधी कॉम्प्युटर आधारित परीक्षा घेतली जाईल. दुसऱया टप्प्यात कॉम्प्युटर आधारित एप्टिटय़ूड टेस्ट घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. मेडिकल चाचणी पूर्ण केल्यानंतर योग्य उमेदवाराला नियुक्तीचे पत्र दिले जाईल.