आधी तिकीट तपासले, मग इन्स्टाग्रामवर रिक्वेस्ट पाठवली

रेल्वेतील टीसीने एका तरुणीला तिकिटाची विचारणा केली. या तरुणीने आपल्याकडचे तिकीटही दाखवले, पण या टीसीने तरुणीला इन्टाग्रामवर रिक्वेस्ट पाठवली. हा माणूस दुसरा तिसरा कुणी नसून माझ्या कोचमधील तिकीट तपासणी करणारा टीसी होता आणि त्यानेच मला इन्स्टाग्रामवर शोधले व फॉलो रिक्वेस्ट पाठवली, असे तिने सांगितले. यामुळे तरुणी घाबरून गेली. रेडीट या सोशल प्लॅटफॉर्मवर तरुणीने धक्कादायक अनुभव सांगितला.