
1 तुम्ही अनेकदा घाईगडबडीत रेल्वेचे तिकीट बुक करता. पण हे रेल्वेचे तिकीट बुक करताना नावात चूक होते किंवा नेमकी प्रवासाची तारीखच चुकीची टाकली जाते.
2 तुम्हाला तुमचे तिकीट दुसऱ्या कुणाला ट्रान्सफर करायचं असेल तर त्यासाठी काही नियम आहेत. तुम्हाला तिकीट कुटुंबातील सदस्यांनाच ट्रान्सफर करता येईल.
3 कन्फर्म तिकिटावर नाव आणि तारीख बदलण्यासाठी ट्रेन सुटण्याच्या किमान 24 तास आधी रेल्वे आरक्षण कार्यालयात जावे लागते. येथे नाव बदलण्यासाठी अर्ज करा.
4 तुम्ही चुकीच्या तारखेला ट्रेनचे तिकीट बुक केले असेल तर त्यात बदल करणे शक्य आहे. काऊंटरवर कन्फर्म तिकीट दाखवा आणि तारीख बदलण्यासाठी अर्ज सादर करा.
5 लक्षात घ्या की, तिकिटावर एकदाच नाव बदलता येते. त्याचबरोबर जर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक केले असेल तर त्यावर नाव आणि तारीख बदलण्याची सुविधा नाही.



























































