
पाऊस-वादळाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी गुगलने आपली नवीन एआयआधारित सेवा लाँच केली आहे. ‘वेदरनेक्स्ट2’ असे या सेवेचे नाव आहे. यामुळे हवामानाचा 99.9 टक्के अचूक अंदाज वर्तवण्यात येईल, असा दावा करण्यात येतोय. पंपनी बऱ्याच काळापासून या मॉडेलवर काम करत होती आणि आता सर्च, जेमिनी व पिक्सेल पह्नमध्ये याचा समावेश करणार आहे.
जुन्या मॉडेलपेक्षा अधिक वेगवान
नवीन मॉडेलबद्दल कंपनीने म्हटले आहे की, ते जुन्या मॉडेलपेक्षा अनेक पट वेगवान आणि अचूक आहे. एआय बेस्ड हवामानाचा अंदाज संशोधन प्रयोगशाळांमधून बाहेर येईल आणि लाखो युजर्सपर्यंत पोहोचेल.
गुगलचे बऱ्याच दिवसांपासून काम सुरू
गुगल बऱ्याच काळापासून एआयआधारित हवामान तंत्रज्ञानावर काम करत आहे आणि आता ‘वेदरनेक्स्ट2’ सह हे काम पूर्ण झाले आहे. याबाबत पंपनीने म्हटले आहे की, हा हवामानाचा अंदाज अधिक अचूक आणि चांगला असेल. आता गुगल तापमान, पाऊस आणि वाऱ्याच्या वेगाचा अंदाज बांधू शकणार आहे.
कामगिरीत प्रचंड सुधारणा
पारंपरिक भौतिकशास्त्रावर आधारित मॉडेल्स अंदाज तयार करण्यासाठी अनेक तास घालवतात. गुगलची टीपीयूची चिप आता एका मिनिटापेक्षा कमी वेळेत हे काम करू शकेल. याचा फायदा केवळ सामान्य लोकांनाच होणार नाही, तर त्या उद्योगांनाही होईल, जे रिअल-टाइम आणि हाय-रिझोल्यूशन फोरकास्टनुसार वापरले जाईल.




























































