जालन्यात वादळ वाऱ्य़ासह जोरदार पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्हाभरातील विविध ठिकाणी आज वाळद-वारा व गडगडाटासह कुठे रिमझिम तर काही प्रमाणात गारांचा पाऊस पडला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. दरम्यान भोकरदन तालुक्यातील हसनाबाद परिसरात जोरदार पाऊस झाला.

आज दुपारनंतर प्रचंड उकाडा तयार होऊन दुपारी तीन वाजेनंतर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध,हसनाबाद वादळी-वाऱ्य़ासह पाऊस झाला. बदनापुर तालुक्यात व जालना परिसरात रिमझिम पाऊस झाला. यामध्ये जालना, बदनापूर, गोलापांगरी,सेलगाव आदी ठिकाणी मेघगर्जनेसह तुरळक पाऊस पडला.