जालन्यात मुसळधार पाऊस; पिकांचे नुकसान

जालना जिल्ह्यातील बहुतांश भागात सोमवारी दुपारनंतर वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. काढणी सुरू असलेल्या सोयाबीन व मका पिकांचे पावसामुळे नुकसान झाले. जुना जालना भागातील सकल भागात पाणी साचल्याने अनेक वाहने बंद पडली होती. या भागात नेहमीच पावसाचे पाणी साचत असल्याने नगर पालिकेतर्फे कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. याचाच फटका दुपारी झालेल्या पावसामुळे नागिरकांना बसला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या