
सामना प्रतिनिधी । जालना
जालना जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. या गारपीटीमुळे आंबा, गहू, ज्वारी, हराभरा ,मोसंबी आदी पिकाना जोरदार फटका बसला आहे. बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील पारध, रेणुकाई पिंपलगांव येथे सुमारे 20 मिनीटे गारांचा पाउस पडला. तर घनसावंगी तालुक्यातील वडी रामसगाव येथे ही गारांचा पाऊस पडला. जाफराबाद तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
























































