मराठवाड्याला मोठा दिलासा, सर्वदूर पावसाचे पुनरागमन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

मराठवाड्यातील नांदेड, बीड, हिंगोली जिल्ह्यांत काल रात्रीपासून पावसाने हजेरी लावली असून त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांवरचे मोठे संकट टळले आहे.

नांदेडमधील देगलूर धर्माबाद, भोकर, माहुर,हदगाव, हिमायतनगर, उमरी तालुक्यात बुधवार रात्रीपासून पाऊस पडत असून गुरुवार सकाळी देखील पाऊस सुरूच आहे. बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्य़ांत बुधवार रात्रीपासून पाऊस सुरू आहे. तर हिंगोलीत पाचही तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र आता पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर झाली असून आता पिकाची मदार परतीच्या पावसावर अवलंबून आहे.