
आज मुंबईत सकाळी अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे ऐन थंडीत मुंबईकरांना स्वेटर ऐवजी रेनकोट घालण्याची वेळ आली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे कामला निघालेल्या नागरिकांची धावपळ उडाली.
Maharashtra: Parts of Mumbai receive light drizzle; visuals from Wadala area. pic.twitter.com/ckh83q0DZW
— ANI (@ANI) December 11, 2020
मुंबईच्या दादर, माहिम आणि माटुंगा भागात पाऊस पडला. प्रभादेवी भागात अचानक पाऊस पडल्यामुळे दोन दुचाकी घसरल्या. या अपघातात दुचाकीस्वारांना किरकोळ दुखापत झाली. दरम्यान मुंबईसह अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.

























































