मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

प्रातिनिधिक फोटो

महानगरी मुंबईमध्ये (9 जुलै) सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई तसेच उपनगरांमध्येही पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे. पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर साचण्यास आता सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या काही तासांमध्ये मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असे सांगण्यात आले आहे.

सकाळपासून सुरु झालेल्या या पावसामुळे, कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. उपनगरांसह शहरी भागात पावसाची संततधार वाढताना दिसत आहे. या पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून, नागरिकांना घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.