
ऑगस्ट महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बरसायला सुरुवात केली. त्यामुळे बळीराजासह सर्वजण सुखावले होते. मात्र, आता पवासाने राज्यातून काढता पाय घेतल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र पावसाने बरसायला सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता सप्टेंबर महिन्यात ठिकठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असून सरासरीइतका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जोर धरलेल्या पावसाने रविवारी राज्यातील काही भागांतून काढता पाय घेतला आहे. मात्र, काही भागात तीन ते चार दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस कायम असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आता राज्यात पावसाचे प्रमाण कमीजास्त राहणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून दडी मारून बसलेला पाऊस हवामान खात्याच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात बरसण्यास सुरुवात झाली आणि बळीराजा सुखावला. पावसाने काही भागात चांगला जोर धरला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस असेच पर्जन्यमान राहणार असून कोकण, पालघर, ठाणे भागात मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. राज्यातील शेतीसाठी अजूनही चांगल्या पावसाच्या बळीराजा आहे.



























































