मृग नक्षञाच्या एक दिवस अगोदरच लातूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचे दमदार आगमन झाले आहे. शहरासह जिल्ह्यातील काही भागात पाऊस सुरू झाला. परंतु नालेसफाईची कामे न झाल्यामुळे शहरातील गटारे तुंबली आहेत. त्यामुळे रस्त्यावरून चालताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.
मृग नक्षत्राच्या एक दिवस अगोदरच लातूर जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन झाले आहे. लातूर शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला. दिड तासांपेक्षा अधिक वेळ पाऊस झाला. तसेच अहमदपूर आणि वडवळ नागनाथ येथे सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. लातूर शहरातील अनेक भागात तुंबलेल्या गटारांमुळे पाणी रस्त्यावरून वाहत होते. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करणे गरजेचे होते. परंतु नालेसफाई न झाल्यामुळे गटार तुंबू लागली आहेत. त्यामुळे रोगराई पसरण्याची भिती वर्तवली जात आहे.