देश म्हणजे काय धर्मशाळा नाही – राज ठाकरे

1551

135 कोटी लोकांचा भार सांभाळण्यातच देश कमी पडत असताना बाहेरच्या लोकांना आपण हिंदुस्थानात घेत आहोत. त्यांची व्यवस्था कोण करणार, असा सवाल करतानाच देश म्हणजे काय धर्मशाळा नाही असे ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत (सीएए) त्यांनी आपले मत मांडले.

सीएए कायद्याच्या आधारे हिंदुस्थान अन्य देशांमधून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, पारशी, ख्रिश्चन, जैनधर्मीयांचा स्वीकार करणार आहे. पण बाहेरच्या लोकांच्या सोयीसाठी हा देश नसून माणुसकीचा ठेका फक्त हिंदुस्थाननेच घेतलेला नाही असे राज ठाकरे म्हणाले. घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी आपले पोलीस सक्षम असून केंद्र सरकारने ती जबाबदारी राज्यांवर सोपवली पाहिजे असे ते म्हणाले. त्यासाठी आंतरराज्यीय स्थलांतर कायदाही आहे, असेही त्यांनी सांगितले. युरोप, अमेरिकेमध्ये तेथील पोलीसच संशयितांची चौकशी करतात आणि ते घुसखोर असल्याचे समजले तर त्यांना पुन्हा त्यांच्या देशात किंवा मग तुरुंगात पाठवायचा पर्याय ठेवतात असे उदाहरणही त्यांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या