राममंदिरावरून दंगल घडविण्याचा कट, राज ठाकरे यांची नवी मुक्ताफळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

ओवेसींना हाताशी धरून राममंदिराच्या मुद्दय़ावरून देशात दंगल घडविण्याचा कट असल्याची नवी मुक्ताफळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उधळली आहेत. या कटाबाबत माहिती देणारा फोन आपल्याला दिल्लीवरून आल्याचा दावाही त्यांनी केला. विक्रोळी महोत्सवात ते बोलत होते.

आजपर्यंत कोणी रामाची, हनुमानाची जात विचारली नाही, मात्र ही मंडळी अशी विधानं करून जाती-धर्मांमध्ये आगी लावण्याचे उद्योग करीत आहेत. हिंदू-मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करून मते मागायची हा एककलमी कार्यक्रम सरकारचा असणार आहे. तेव्हा जागे राहा असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळून पुन्हा सत्तेत यायचा सत्ताधाऱयांचा उद्देश आहे असा आरोपही त्यांनी केला. राज ठाकरे यांच्या नव्या मुक्ताफळांची माहिती मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून देण्यात आली आहे.